मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 11

  • 8.7k
  • 1
  • 4.3k

पुढे... आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यावर नाराज राहू शकतो, त्याचा राग करू शकतो, पण त्याचा तिरस्कार करू शकत नाही... राग, नाराजी आपण त्याच व्यक्तीवर करतो ज्याच्यावर आपण आपला हक्क समजतो.. आणि हक्क कोणावरही गाजवल्या जात नसतो ना...!! प्रेमात नकळत आपण त्या व्यक्तीला आपण मानून घेतो, त्यामुळे त्याच्यावरचा रागात किंवा नाराजीतही त्याच्यावरचं प्रेम सुतभरही कमी होत नाही.... प्रेमात राग म्हणजे कसं असते माहीत आहे का??? जसा एखाद्या गडद रंगाच्या कपड्याला आपण जितकं घासणार, जितकं धुणार त्यातून तेवढाच रंग बाहेर पडत जाणार...प्रेमाचंही तसंच आहे...जितके भांडणं होतील, एकमेकांवर नाराजी असेल तरी ते प्रेम वाढतंच जाणार...आजपर्यंत तरी माझं अतुलवरचं प्रेम कमी झालं नाहीये...मग