भाग ...१ अस्मिता ने आवरता आवरता घड्याळ पाहिलं आणि तिचे डोळेच मोठे झाले..सव्वा सात वाजले होते आणि सात ची बस केव्हाच निघून गेली असणार या विचाराने ती अस्वस्थ झाली होती.आता कॉलेज चे पहिले दोन लेक्चर चुकणार या विचाराने च ती थोडी पळतच बस स्टँड कडे गेली..पणं रस्त्यातच तिला बस आडवी आली..तिने हात दाखवून बस थांबवली. ती कॉलेज स्टूडेंट असल्यामुळे बस ड्रायव्हर ने ही बस मध्येच थांबवली व अस्मिता पटकन बस मध्ये चढली. इकडे बस मध्ये सिट वर बसलेला अखिल बराच वेळ अस्वस्थ होता पणं खिडकीतून अस्मिता पळत येताना दिसली तशी अखिल च्या चेहऱ्यावर मोठी शी स्माईल आली..आणि त्याचं तडफडणार मन