पाऊसः आंबट-गोड! - 2

  • 8.8k
  • 3.3k

(२) भज्यांवर मनसोक्त ताव मारुन सुंठ-मीऱ्याच्या चहाचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या..."काहीही म्हणा पाऊस पडत असताना भज्यांपाठोपाठ असा चहा म्हणजे एक अलौकिक आनंद...""आणि सोबत तात्यांच्या पावसाळी आठवणी म्हणजे आमच्यासाठी कपिलाषष्टीचा योग!" मी म्हणालो. तसे हसत तात्या म्हणाले,"व्वा! कविराज, व्वा! आलो होतो या विचाराने की, मोसम बनला आहे. आषाढदिन आहे. तुमच्याकडून छान कवितांचा त्यातच पावसाळी कवितांचा आस्वाद घ्यावा. पण तुम्ही तर आम्हालाच बोलते करीत आहात...""कसे आहे तात्या, आम्ही कवी तर नेहमीच अगदी समोरच्या माणसांना कंटाळा येईपर्यंत ऐकवत असतो. तुमच्या आठवणी का नेहमी नेहमी ऐकायला मिळणार आहेत? महत्त्वाचे काय तर तुमच्या आठवणी अर्थात तुमच्या परवानगीने शब्दबद्धही करता येतीलच की...""क्या बात है।