जल तू ज्वलंत तू! - 4

  • 5.8k
  • 2.2k

4 ------------------ फिन्जानची आई मूळची भारतात राहणारी होती. तिचा जन्म जैसलमेर जवळच्या एका लहान गावात झाला होता. रस्बीने वयाच्या चार वर्षांपर्यंत चंद्र पाहिला नव्हता. तिला हेही माहीत नव्हते की, तारे म्हणजे काय? पानं, फुलं, झाडं, पक्षी चार वर्षांपर्यंत दिसले नव्हते. वाळू आणि वाळू! चारी बाजूला उंच दगडी भिंत आणि आकाशातून येणारे ऊन एवढेच तिला माहीत होते. तिची आई अशा उन्हात इतर स्त्रियांबरोबर दळण दळत असे. कापड विणत असे. कधी बांबूच्या परड्या बनवत असे. कधी खडी फोडत असे. हे करत असताना तिला कांदा, चटणी, वरण आणि चार भाकरी मिळत. त्या भाकरी आई खात असे व काही तुकडे रस्बीला देत असे. तेव्हा