श्वास असेपर्यंत - भाग १६

  • 7.1k
  • 2.7k

यंदाचं एम. ए.मराठी चं वर्ष होतं. मी आणि आनंद सोबतच होतो. आईला मी मिळालेल्या कामातून नियमित पैसे पाठवित असायचो. कधी आईसाठी काही घेऊन जायचो. तेव्हा आई मात्र भलतीच खुश असायची. पण बाबांची आठवण आली की , तिचा चेहरा पार उतरून जात असे. मी एम. ए. मराठी हा विषय घेतला असल्याने एम. ए. झालं की, कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्वांवर वा जमेल तर पूर्णवेळ नोकरी करायची असं स्वप्न पाहत बसायचो. कारण आतापर्यंतची सर्व शिक्षणाची कागदपत्रे म्हणण्यापेक्षा सर्टिफिकेट सर्वांच्या नजरेत येईल अशीचं होती . त्यामुळे आपण नक्कीचं