दिलदार कजरी - 24

  • 6.3k
  • 1
  • 2.5k

२४. नदी किनारी भेट कजरीशी कजरी आज उठली ती खुशीतच. स्वतःशीच खुदकन हसत. दिलदार दिलवर बनून तिच्या दिलावर राज्य करत होताच. सकाळ नि दुपार त्याला भेटण्याची वाट पाहण्यात, संध्याकाळी त्याच्याशी बोलण्यात नि रात्र ते सारे आठवून त्यात रमण्यात जायची. पण रात्री दिलदार चक्क स्वप्नातच आला. खिडकीतून आला म्हणे! झाडावरून खिडकीतून? पण खरोखरच आला असता तर? चंबळनदीच्या किनारी तो मोठा खडक त्यांच्या प्रेमकथेचा साक्षीदार होता. त्याच्या पायथ्याशी ती जाऊन बसली. नदीचा हा भाग निर्जन होता आणि तिथे खडकावर बसून दिवसेंदिवस स्वप्ने पाहणे हाच तिचा छंद होता. आज तिथे जाऊन ती बसली, दिलदारची वाट पाहात. काल तो हरिनामपुरात गेलेला, गुरूजी काय म्हणाले