दिलदार कजरी - 27

  • 4.7k
  • 1.8k

२७. पूर्वतयारी! कजरीच्या घरी दिलदारचे आचार्य बनून जाणे थोडे दूरवर गेले, कारण पुजारीबुवाच आपल्या दूरच्या गावी काही दिवसांसाठी निघून गेले. आता त्यांची वाट पाहाणे आले.. नदीकिनारी कजरीला दिलदार सांगत होता, "तुला सांगू, प्रियेची वाट पाहणारा प्रियकर असेल पण आपल्या सासऱ्याची आतुरतेने वाट पाहणारा मीच एक असणार जगात." "का? म्हातारा आचार्य बनायची इतकी हौस आहे?" "नाही. तुझा हात पकडून बसायची आहे.. तू अशी बसलीयेस नि मी हात पाहून भविष्य घडवतोय.." "ज्योतिषीबुवा, भविष्य सांगतात .." "असतील ही. आम्ही घडवतो .. तर मी भविष्य घडवेन.. मग तुझ्या डोळ्यांत डोळे घालून प्रत्यक्ष तुझ्याच घरी बसेन. सर्वांसमोर.. चेहरा वाचन करत! काय छान कल्पना आहे!" "छान