दिलदार कजरी - 28

  • 4.4k
  • 1.5k

२८. पुन्हा आचार्य! मौर्या पुजारीबुवा आरती संपवून घरी परतले आणि दरवाजावर थाप पडली.. "प्रणाम!" "आपण आचार्य? वा! या या.." "देवीका संदेसा आया. चले आए." "अलभ्य दर्शन. अलभ्य लाभ. तुमची आठवण काढली होती हल्लीच. आपल्यासारख्यांचे चरण आमच्या घराला लागले.. " "पांव तो लगे आपके घर, पर वह तो हमारे हाथोंमें नहीं. देवीका इशारा हुवा तो जहां भी हो चले जाते हैं. आज रात संदेसा आया. मौर्यागुरूजी जैसे पुण्यशील व्यक्तिके घर जाने के लिए. चले आए." "बहुत शुक्रिया. रसीलाबेन.. आचार्यजी आए हैं. दूध आणि केळी आणा.." आतून रसीलाबेन बाहेर आल्या. मागच्या वेळी कपभर दूध होते. यावेळी मोठा प्याला भर! दिलदारला दुधाचे वावडे..