झुंजारमाची - 2

  • 7.7k
  • 3.5k

२. झुंजार महाल  उजाडू लागलं तसं रानपाखरांचा चिवचिवाट, किलबिलाट वाढू लागला. पाऊस थांबला होता. तिघांनी माठातल्या पाण्यानं तोंडं धुतली. म्हातारबानं भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेल्या लोखंडी कंदीलात गाभाऱ्यातल्या बुधलीतलं तेल भरलं. कंदील पेटवत तो म्हणाला, "चला... या माझ्या मागून."         वातावरणात चांगलंच गारवा होता. मारत्या, बहिर्जी हातावर हात चोळत उब मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही म्हातारबाच्या मागे चालू लागले. मंदिराच्या मागे झाडाझुडपांनी गर्दी केली होती. पुढे आलेल्या वेली बाजूला सारत म्हातारबा आतमध्ये गायब झाला. पाठोपाठ दोघेही शिरले. समोर एक बारव होती. गुडघ्याएवढ्या उंच पायऱ्या उतरून खाली आले. डाव्या बाजूला मोकळ्या जागेमधून म्हातारबा वाकून आतमध्ये गेला. बारवचं  पाणी हात दीड