झुंजारमाची - 3 - अंतिम भाग

  • 8.1k
  • 3.2k

३. हर हर महादेव  दुपारची वामकुक्षी झाली. थोडासा फलाहार करून शिवबाराजे बाजी पासकरांसोबत वाड्याच्या बाजूला असणाऱ्या बागेमध्ये गावकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकत होते. घटका दोन घटकांत राजे मोकळे झाले. बहिर्जीने राजांची भेट घेतली. सारी हकीकत सांगितली. ती विलक्षण तलवार राजांसमोर पेश केली. तलवार पाहताच शिवबाराजे स्तिमित झाले. आई जगदंबेची कृपा आणि श्री झुंजारमल देवाचा आशीर्वादच मिळाला. राजांनी आतल्या देवघरात तलवारीचं पूजन केलं. बहिर्जीची पाठ थोपटली. रात्री सदरेवर खलबतं झाली. कोण कुठून आणि केव्हा हल्ला करणार ठरवलं गेलं. राजांनी सर्वांना सक्त ताकीत दिली. 'शक्यतो विना हत्यार काम झाले पाहिजे. जो कुणी हत्यार उगारेल तर गय करू नका. पण शक्यतो जीवानिशी कुणालाही मारणे नाही.'