मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 14

  • 9k
  • 1
  • 3.8k

पुढे... कधी कधी नात्यातील ओलावा सुखद क्षणांना आत्मिक समाधान देऊन जातो. या ओलाव्यामुळेच जर गैरसमज होतही असतील तरी ते दूर होतात, जास्त दिवस दुरावा राहत नाही....सहवासातून बहरणारं नातं चांगल्या गोष्टी घडवून आणल्यास अजून फुलतं. कोणावर प्रेम करताना आपल्याला सुख किंवा समाधान केंव्हा मिळतं?? हा प्रश्नही आपल्याला बऱ्याचदा पडतो. मला तरी वाटतं, आपल्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आपल्याला सुखाच्या क्षणाची विलक्षण अनुभूती देऊन जातो. जेंव्हा स्टेशन वर मी अतुलच्या हातात हात दिला, मला जो आनंद झाला तो वेगळा पण त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं होतं ते मला माझ्या आनंदापेक्षाही मोठं होतं.... खरं तर प्रेमात खूप कमी क्षण येतात सुखाचे नशिबात