पुढे... या जगात प्रत्येकाला प्रेमाचे पूर्ण रूप जपण्याचे भाग्य लाभत नाही, प्रत्येकाला ते प्रेम आयुष्यभर जगता ही येत नाही...काही लोकं जन्माला येतात, ते फक्त त्या प्रेमाचा संक्षेप अनुभवण्यासाठी...जसं की मी आणि अतुल...!! आपण सतत बोलत असतो की आयुष्याचा काही भरवसा नाही, कधीही काहीही होऊ शकतं; आयुष्य कितीही अनिश्चित असलं तरी आपण ते जगणं सोडत नाही... मग प्रेमाचंही तसंच असावं ना...जर आपण आयुष्याची साथ सोडत नाही तर छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊन प्रेमाला बगल का द्यायची..?? प्रेम आयुष्यात स्थिरता आणतं आणि त्या एका क्षणानंतर ते स्थैर्य आपल्याला टिकवून ठेवता आलं पाहिजे....आपल्या जीवनाप्रमाणे प्रेमही खूप असुरक्षित, अनिश्चित आहे. ते नकळत आपल्या जीवनात