श्वास असेपर्यंत - भाग २१

  • 6.5k
  • 1
  • 2.5k

अभिनंदन !!!! अमर सर.. छाया मॅडम जवळ येताचं त्यांनी माझ्याशी शेकहॅन्ड करत माझं अभिनंदन केलं. छाया मॅडम म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये इतिहास विषय शिकवित असायच्या. पाहायला सुंदर, थोड्या शरीराने जाड जुड म्हणजे भरल्या होत्या. पण साडी वर अगदी उठावदार आणि कुणालाही आपल्या अदाने घायाळ करतील अश्याचं छाया मॅडम होत्या. मी तासिका तत्त्वांवर लागलो त्यापुर्वी पासून या महाविद्यालयात तासिका तत्वांवर प्राध्यापिका म्हणून होत्या. एका अर्थाने त्या माझ्या सिनियर होत्या, असंच म्हणावं लागेल. लग्न न झालेल्या म्हणजे अविवाहित असल्याने सर्वांच्या लाडक्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. " कशासाठी अभिनंदन करता मॅडम???? "मी छाया मॅडम