पहिलं गुलाब - 2

  • 4.9k
  • 1.8k

अतिदक्षता विभागातील निरव शांतता त्याला अजून अस्वस्थ करीत होती.... औषधे, इंजेक्शन इत्यादींचा उग्र वास त्यात कोरोनामुळे श्वास घेण्यात होणार त्रास यामुळे तो अक्षरशः मरणाची भीक मागत होता ….. इतक्यात एक थंडगार हवेची झुळूक त्याला स्पर्श करून गेली..... वातावरणात अचानक सुगंधित वाटू लागले...त्याने डोळे हळुवारपणे उघडत पाहण्याचा प्रयत्न केला..... ती त्याच्या नजरेस पडली.... दरवाजातून लडिवारपणे स्मितहास्य करीत ती त्याच्या जवळ आली.... तिला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... ती त्याच्या बाजूला येऊन बसली.... त्याच्या केसांतून हात फिरवत तिने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला..... त्याला तिच्याशी खूप काही बोलायचे होते.... परंतु तोंडावर ऑक्सिजनचा मास्क असल्याने शब्द उमटत नव्हते.... त्याच्या मनाची घालमेल तिने