मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 20

  • 9.2k
  • 1
  • 3.8k

पुढे... "कुछ किस्से कहाणीयां मिटाये नही जाते, कुछ लोग बिछड कर भी भुलाये नही जाते।" गैरसमजाच्या चक्रव्युव्हात नातं भरकटलं तर त्या नात्याचा प्रवास संपतो...आपल्या ढासळणाऱ्या भावनिक नात्याची बांधणी पुन्हा करण्यासाठी लागतो तो संवाद, आणि तोही वेळेवर...माझ्या हातून ती वेळ आणि ते नातं दोन्हीही निघून गेलं...उरली ती पोकळी...कधीही भरून न निघणारी... कोणाच्या जाण्याने आयुष्य संपत नाही किंवा थांबतही नाही पण ती एक खास व्यक्ती निघून गेली तर आयुष्य पूर्ण ही होत नाही...आपल्याला आवडणारी व्यक्ती अनपेक्षितपणे दूर जाण्यासारखं मोठं दु:ख नाही... मनाच्या हळव्या कोपऱ्यात त्या व्यक्तीला स्थान द्यावं; आणि नियतीच्या एका खेळीने ती जागा रिकामी करण्याची वेळ आली तर ते दुःख असहनिय