जे पेराल तेच उगवेल

(12)
  • 22.3k
  • 2
  • 6.4k

एकदा एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. *तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो*. त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो.