दोष कुणाचा?

  • 9k
  • 2
  • 2.9k

सकाळची प्रसन्न वेळ होती. नेहमीच्या कार्यालयीन कामाला सुरवात झाली होती. नेहमीप्रमाणेच ओ.पी. डीत महीलांची प्रसुतीपूर्व तपासणीसाठी गर्दी होती. त्यात पूर्वी तपासणीसाठी आलेल्या गरोदर महिला एच. आय. व्ही. रिपार्ट घ्यायला आलेल्या होत्या. ठरावीक सरावाने रिपोर्ट देणे आणि आवश्यक मार्गदर्शन देणे सुरू होते. त्यात रीपोर्ट लिहीता लिहीता माझा हात अडखळला 'पॉझेटीव्ह' भी मान वर करून पाहील. साधी सरळ, मोठ्या डोळ्यांची निरागस चेहरा, लाजाळू व्यक्तीमत्वाची नुकतच लग्न झालेली 20 वर्षाची तरुणी माझ्याकडे पाहात होती. चेहरा हसरा होता. तीला रीपोर्टबद्दल कसं सांगाव ? याबद्दल मी विचार केला व हळूच तीला नेहमीच्या सरावाने विचारल "उमा ! त्या दिवशी मी जी माहीती दिली ती कशाबद्दल आठवते