वंशाचा दिवा

  • 12.5k
  • 4.1k

"मॅडम हिचा गर्भपात करायचा आहे". एक वयस्क म्हातारी सांगत होती. तिच्या सोबत उंचशी, सावळी पण स्मार्ट मुलगी दुःखी चेहऱ्यांनी उभी होती. नुकतीय ओ. पी.डी .सुरू झाल्याने विशेष गर्दी नव्हती. मी त्या दोघींना बसायला सगीतले. दोघी बसल्या .मुलगी अस्वस्थच वाटत होती. म्हातारी चेह-याने मवाळ होती ,पण तिच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. "ह ! आता बोला काय समस्या आहे ? मी प्रश्न केला.