लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात दिसणारा त्रिकोणी आकाराचा ठिपका म्हणजे कळसूबाई शिखर आम्ही वयाच्या चाळीशीनंतर सर करू असं स्वप्नात पण वाटले नव्हते. अनिल मला नेहमी म्हणायचा आपण कळसूबाई ट्रेक करूया. पण मी , "आपल्याला जमणार आहे का? मला पाठीचा त्रास आहे. येवढं चालायला मला जमेल का? तूच जा एकटा !"असं बोलून टाळाटाळ करायचे. पण तोही एवढा हट्टी की मला एका बाजूने हळू हळू समजावत तयार करत होता तर दुसऱ्या बाजूला ट्रेकची सगळी माहिती काढत होता. ब्लॉग्ज वाचत होता, व्हिडिओ बघत होता. त्याच्या या प्रयत्नाला यश आले आणि मी एकदाची तयार झाले, कळसूबाई ट्रेक करायला! आता हा ट्रेक म्हणजे