स्वावलंबन उद्या मावसभावाचे लग्न असल्यामुळे नितीन आजच मावसभावाच्या गावी गेला होता. त्याचे आई-वडील, भाऊ, वहिणी, बायको, एक तीन वर्षांचा पुतण्या व त्याची एक वर्षाची लहान मुलगी हे सर्वजण लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी येणार होते. नितीनने खास लग्नात घालण्यासाठी पाच हजार रु. किंमतीचा एक ड्रेस विकत घेतला होता. तो ड्रेस त्याने घरीच ठेवला होता व उद्या येताना घेवून येण्यास आपल्या पत्नीला म्हणजेच शितलला सांगीतले होते. मावसभावाचा कलवरा होवून नितीन नवरीच्या गावी गेला होता. लग्नाचा दिवस उजाडला, लग्नाची वेळ जवळ आलेली होती. तरी नितीनच्या घरच्या मंडळींची गाडी आलेली नव्हती. त्याने आपल्या भावाला फोन करून विचारले असता त्याच्या भावाने अर्ध्या