पेंटिंग...

  • 7k
  • 2.5k

कथेचे नाव: पेंटिंग (आयुष्याच्या कॅनव्हास मध्ये रंग भरणारी संघर्षमय प्रेम कहाणी) 'पावसाळा…. पावसाळा आला की प्रेमाला उत येतो.. 'उत' म्हणणं बरोबर नाही 'उधाण' येत असे म्हणूयात.. परंतु शब्द बदलले तरी भावना थोड्याच बदलतात, भावना त्याच राहतात. प्रेमाला कितीही शब्दांच कोंदण लावलं तरी प्रेमाच्या सौन्दऱ्यात भर ही पडत नाही आणि प्रेम कमीही होत नाही. प्रेम हे इतकं सुंदर असत की ते फक्त आपण करायचं असतं आपण कधी सुंदर होऊन जातो हे आपलं आपल्याला कळत नाही.' समोर अचानक सुरू झालेली संततधार पाहत पाहत समीर स्वतःची डायरी लिहीत होता. टपरी वर अचानक त्या पावसात ही गिऱ्हाईक आल्याने त्याची तंद्री भंग पावली होती. गिऱ्हाइकाकडे