नव्या..

  • 6.8k
  • 2.6k

*नव्या* "केतकी...! नव्या आता out of danger आहे. काळजी घ्या तिची. रक्त जास्त गेल्याने अशक्तपणा आला आहे तिला. तिची काळजी घे. ती ना पोलिसांशी धड बोलत आहे की काउन्सेलरशी. झोपली आहे आता. तिला मानसिक आधाराची खूप गरज आहे.तू सावर तिला" असे बोलून केतकीची मैत्रिण डाॅ. सना बेग तिथून निघून गेली. "हिने तिची काळजी घेतली असती तर पोरीने स्वतःहून मरणाचा घोट नसता घेतला. हिला काय करायचं पोरीशी... शेवटी वांझोटीच ना...!" जोरातच केतकीच्या सासूबाई बोलल्या. सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या नव्याकडे गेल्या. अवघ्या एकोणीस वर्षांची नव्या मृत्यूशी झगडून परत आली होती. तिच्या हाताला लागलेली ओली जखम बघून केतकीच्या काळजात चर्र झालं.