क्वीक बाईट रेस्टॉरंट मधे गरम गरम साबुदाणा खिचडी व चहा घ्यायचा असा निर्णय करून मी घरातून सकाळी सहाच्या सुमारास निघालो. ताम्हिणी घाटाच्या अलिकडे असलेलं हे रेस्टॉरंट मला आवडायचे. दीड दोन तासांच्या ड्रायव्हिंग नंतर, येथील अर्ध्या तासाचा मुक्काम सुखावह वाटायचा. या मार्गावरचा हा माझा आवडता थांबा. नेहमीप्रमाणे, मी गाडी पार्किंग लॉट मधे नेली. एंजीन बंद करून दार उघडत असताना माझी नजर समोर खिळून राहिली. रेस्टॉरंट च्या व्हरांड्यात एक महिला मोबाईल वर बोलत होती. ती अतिशय सुरेख दिसत होती. तिचा पेहराव म्हणजे साडी सुरेखच होती. तिच्या बोलण्यात व हालचालीत सहजता होती. नजर माझ्या गाडीकडे च होती. फोनवर चे बोलणं थांबवून