नकळत सारे घडले (भाग १)

  • 12.7k
  • 1
  • 6.1k

अजय एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा.आई वडील,आणि दोन लहान बहिणी ,मोठी स्वाती तर लहानी नीता.अजयची आई म्हणजे सीमाताई नोकरी करीत असतात तर अजयचे वडील सुरेशराव ह्यांना पॅरॅलीस झाल्याने ते घरीच असतात.त्यांच्या जागेवरच सीमाताईंना नोकरी लागलेली असते, परिस्थिती ने खूप श्रीमंत नसले तरी आनंदी असं अजयचे कुटुंब असतं.. अजय दिसायला देखणा, प्रामाणिक, प्रेमळ,समंजस,मोठ्या माणसांचा आदर करणारा,इतरांची मदत करणारा .आईवडीलां ना अजयचा फार अभिमान वाटायचा ,खूप विश्वास होता त्यांचा अजयवर .अजयचे 3 जिवलग मित्र होते संतोष, अवी आणि राजू ,हे तिघेही श्रीमंत घरातले होते मात्र त्यांना त्याचा गर्व नव्हता.हे चौघेही नेहमी एकत्र असत,मित्र परिवार चांगला असल्याने अजयच्या आईला त्याची जास्त काळजी नव्हती.पाहता पाहता