नकळत सारे घडले (भाग ३)

  • 8.6k
  • 4.3k

अजय संध्याकाळी घरी येतो, फ्रेश होतो आई त्याच्या हातात चहाचा कप देते..अजयचा चहा पिऊन झाल्यावर अजय अश्विनी कडे जाणार असतो.. तो बाहेर पडणारच की तेवढ्यात ... "अजय ,थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी"आई.. "हो बोल न आई"अजय... " आज तुझं कपाट आवरलं मी" आई "अच्छा ,मग" अजय " मग काय अजय, मला तुझे आणि अश्विनी चे पत्र,ग्रीटिंग मिळाले..काय सुरू आहे हे तुमच,इतके दिवस झाले आणि आम्हाला याचा जराही थांगपत्ता लागु नाही दिला तुम्ही ,विश्वासघात केला आहेस तू, याचे काय परिणाम होणार आहे याची कल्पना तरी आहे का तुला" आई.. "आई माफ कर ग,मी नाही विश्वासघात केलाय तुझा,आमचं खरं प्रेम आहे