अजब लग्नाची गजब कहाणी (भाग ३)

  • 10.9k
  • 6.8k

" काय !! रविवारी अकोला जायच आहे मुलगी पाह्यला ..मला न विचारता ठरवलंच कस तुम्ही?? मी येणार नाही अजिबात तुमच्यासोबत ..तुम्हीच जात बसा" रघुवीर चिडून म्हणाला.. " म्हणजे तुझ्या आयुष्याचा इतकाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे का आम्हाला आणि तुला मुलीचा फोटो बघ म्हणलं तर तेही नको म्हणतोय " रुख्मिणी रागात आजी म्हणाल्या.. " जिजी अग तस कुठे म्हणलं मी पण मला एकदा विचारायचं तर खरी ..मला काम असतं बँकेत आणि प्लिज आता फोटो वगैरे पाहण्याची जबरदस्ती नको करू मला" रघुवीर नरमाईने बोलला.. " रविवारी कसली काम असतात रे तुला..ते काही नाही आपण जातोय रविवारी ..अरे तुला माहिती का मुलीची