सांग ना रे मना (भाग 3)

  • 7k
  • 3.8k

जख्म कहा कितने मिले क्या रखे हिसाब? गिरते संभलते है फिर भी अबतक जिंदा है जनाब ।" मितेश काम करत होता तेव्हा मेसेज ची टोन वाजली त्याने पाहिले एफ बी वर मेसेज आला होता. संयुक्ता नाव दिसले म्हणून त्याने मेसेज ओपन केला. हॅलो सर मला तुमच्या कविता ,शायरी खूप खूप आवडतात. मी तुमची जबरदस्त फॅन आहे. म्हणून तुम्हाला इथे एफ बी वर शोधुन काढले आणि फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली आहे. प्लिज अकॅसेप्ट करा सर. मितेश एकटाच हसला. त्याने तिला थँक यु सो मच असा रिप्लाय केला. रिप्लाय दिला नसता तर तो किती रूड आहे असं वाटले असते तिला. इतका मोठा