अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ४)

  • 10.5k
  • 1
  • 6k

बघता बघता शनिवार आला.अग्निहोत्रींकडे पाहुणे येणार म्हणून सगळी तयारी झाली होती.जानकी मात्र मनातल्या मनात मात्र देवाकडे प्रार्थना करीत होती की हे लग्न जुळू नको देऊ.." सुन सुन सुन दीदी तेरे एक रिश्ता आया है " गाणं म्हणत ओंकार जानकी जवळ आला.."ओंक्या.. माकडा गप बस न .मी इकडे टेंशन मध्ये आहे अन गाणी सुचत आहेत " जानकी ओंकार कडे उशी फेकत म्हणाली.." ओय टेंशन कशाला घेते? लग्न तर करावंच लागणार होतं न एक ना एक दिवस मग .." ओंकार म्हणाला.." हो पण इतकी काय घाई आहे घरच्यांना , तू बघ एकच वर्षाने लहान आहे माझ्या पेक्षा तुझ्या लागलेत का मागे लग्न