अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ५)

  • 10.2k
  • 5.8k

    जानकी बैठकीत आली..रघुवीरला तिच्याकडे बघून अस वाटत की बहुतेक ही नाराज आहे तिलाही लग्न करायची इच्छा नसावी . वडीलधाऱ्या व्यक्तींना तिने वाकून नमस्कार केला..तिने हळूच नजर रघुवीर वर टाकली तो तिच्या कडेच बघत होता. दोघांची नजरानजर झाली .जिजींनी तिला त्यांच्या जवळ बसवलं.औपचारिकता म्हणून प्रश्न विचारले,जानकी ची आवड निवड विचारली..रघुवीर आणि जानकी ला निवांत बोलता यावं म्हणून दोघांना वरच्या मजल्यावर बोलायला पाठवलं.खुर्चीवर दोघे बसले खरतर काय बोलाव त्यांना कळतं नव्हतं. " काय उकडतं हो तुमच्या अकोल्यात .जेमतेम फेब्रुवारी महिना सुरू आणि इतकी गर्मी" रघुवीर शांतता भंग करत म्हणाला..जानकी आश्चर्या ने त्याच्याकडे बघत होती तो अस काही बोलेल हे तिला