ससा आणि कासवाची कहाणी ही रूपकात्मक बालकथा सर्वश्रुत आहे. संथ परंतु अविरत परिश्रम केल्याने यशप्राप्ती होते , या तिच्या मुळच्या बोधास धक्का लावण्याचा माझा मानस नाही. परंतु ,या विजोड शर्यतीमधून ,स्पर्धा व परीक्षा या संकल्पनेवर मी भाष्य करणार आहे. आपल्या क्षमतेहून कमी असणाऱ्या ,संथ कासवाची चपळ सशाने शर्यतीसाठी निवड ही त्याला relax -चिंतामुक्त होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी प्रवृत्त करते. तुल्यबळ स्पर्धा नसल्याने जिंकूनही त्याच्या प्रतिष्ठेत भर पडली नसती. या व्यतिरिक्त ,अविरत ,अखंड परिश्रम -hard work सोबत, smart work चा काळ आहे. बाल्यावस्थेपासून स्पर्धा ,परीक्षा आपल्या जीवनाचा भाग होतात . यांना पार न करता आपण पुढे जाऊ शकत नाही , इतक्या