अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ६)

  • 9k
  • 5k

अमरावती पोहचत पर्यंत रघुवीर ला जानकी पसंत आहे नाही हे विचारत विचारत सगळ्यांनी वैतागून टाकले पण रघुवीर नंतर सांगतो हेच उत्तर देत होता..घरी आल्यावर ही पुन्हा जिजींनी त्याला विचारलं तरीही त्याच उत्तर तेच विचार करून सांगतो..आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला.." काय एवढा विचार करतोय काय माहिती..इतकी गोड मुलगी आहे जानकी ,सुंदर तितकीच सालस आहे हो मला तर बाई फार आवडली" जिजी म्हणाल्या.." हो मला सुध्दा खूप आवडली जानकी.खूप चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे.मला तर अस झालय की कधी लग्न करून ती आपल्या घरी येतेय" रमाताई म्हणाल्या.." एकुलती एक मुलगी इतक्या लाडात वाढलेली पण जिजी कामाचा किती उरक आहे तिला