अश्रुतपुर्व - 1

  • 6.9k
  • 3.1k

बाबा माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले, पाणी विसरले म्हणून ताट तिथेच ठेवून पाणी आणायला गेले आणि नेमका हेमंत आत आला. त्याला बघितले .... ताट हातात घेऊन त्याला जोरात फेकून मारले. हेमंतचा जोरात ओरडण्याचा आणि ताट पडल्याचा आवाज ऐकून सगळेच आत धावत आले. हेमंतला कपाळाला खोच आलेली बघून काकू एकदम पिसाळल्या,"एकतर काही बोलत नाहीये. घुम्यासारखी बसून राहिली आहे, वर हेमंतला ताट फेकून मारते...." त्यांना जास्त बोलू न देता काकूंच्या हाताला धरून आज्जी त्यांना बाहेर घेऊन गेल्या. इतकावेळ स्तब्ध होऊन उभा राहिलेला हेमंतपण लगेच बाहेर पळाला. आईबाबा माझ्या जवळ येऊन बसले नि माझा सगळा बांध सुटला. मी जोरजोरात रडायला लागले. रडताना नेहमी