अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ८)

  • 8.5k
  • 4.8k

साखरपुड्याच्या तयारीत पंधरा दिवस कसे गेले कळलंच नाही. या पंधरा दिवसात जानकी आणि रघुवीर च एकदाच बोलणं झालं होतं.त्यानंतर दोघांनीही एकमेकांना ना फोन केला न मॅसेज. रघुवीरच्या घरून मात्र जानकीला वरचेवर फोन यायचे.रघुवीर ची मोठी बहीण गायत्री तिच्या नवरा आणि मुलासोबत अकोल्याला पोहचली होती. तीच ही जानकी सोबत फोनवर बोलणं व्हायच..घरातलं उत्साहच वातावरण बघून जानकीला सगळ्यांना फसवत असल्याने अपराधी वाटायच..काळजी,हुरहूर, सल अश्या अनेक भावनांची गुंफण तिच्या मनात होती..पाहता पाहता साखरपुड्याचा दिवस उजाडला..देव कुटूंबीय त्यांच्या पाहुण्यांसकट सकाळी अकराच्या सुमारास हॉल वर पोहचले .साखरपुड्याचा मुहूर्त तसा दुपारी चार वाजताचा होता..अग्निहोत्रींनी त्यांच अगदी जंगी स्वागत केल .हार,बुके सह फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.आल्या