गोटयाला 'रंगीला' हे नाव त्याच्या मित्रांनीच ठेवले होते. मित्रच एवढे बिलंदर असतात की ते कोणाच्या कोणत्या खोडीवरून काय नाव ठेवतील ते सांगता येत नाही. गोटयाचे ‘रंगीला’ नाव पडण्यामागेही एक कारण होते. गोटया आता एकवीस वर्षाचा झाला होता. वयात आल्यापासून त्याला मुलींचे जरा जास्तच आकर्षण वाटु लागले होते. कॉलेजमध्ये पण तो नेहमी मुलींच्या मागे-मागे फिरायचा. गावात कोणाचं लग्न असेल तर गोटया मुद्दामहून बायकांच्या पंगतीत वाढण्यासाठी जायचा. तो काही कामधंदा करत नव्हता पण तरीही तो 'लग्न करून द्या' म्हणून आई-वडीलांच्या मागे लागला होता. कधी-कधी तो याच कारणाहून रूसून बसायचा. गावातील इतर प्रौढ माणसांना 'माझ्या लग्नाबद्दल आमच्या वडीलांना बोला' अशी विनवणी करायचा. लोक