अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ९)

  • 9.2k
  • 4.9k

दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू होती.. कपडेलत्ते,दागिने,देण्याघेण्याच्या वस्तू,आहेर,रुखवत, जानकीला देण्याच्या भेटवस्तू अशी बरीच खरेदी सुरू होती..जानकी आणि रघुवीर च्या मनात मात्र वेगळंच होत हे लग्न करण्याची त्यांची कारण वेगळी होती घरच्यांना ह्याची कानोकान खबर नव्हती .दोन्ही घरचे लोक खूप आनंदी होते.. जानकीला मात्र टेंशन होत ,तीच आणि रघुवीरच अधेमधे फोनवर बोलणं व्हायचं आता दोघांमध्ये बऱ्यापैकी मैत्री झाली होती.आवडी निवडी कळू लागल्या होत्या पण अजूनही रघुवीर ने जानकीला रागिणी बद्दल काहीच सांगितले नव्हते.. रागिणीच्या मनातही सारखा रघुवीर चा विचार यायचा..तिचेही मन त्याच्यात गुंतत चालले होते पण अजूनही तिच्या मनातली गोष्ट मनातच होती..रघुवीर ने एक दिवस दिनेश ला त्याच्या मनातलं रागिणीबद्दल असलेलं