सांग ना रे मना (भाग 26)

  • 4.5k
  • 2.3k

निनाद ने संयु ला कॉल लावला आता मितेश ला तीच सांभाळू शकते हे त्याला माहित होते पण संयु चा नंबर चुकीचा आहे असं येत होते. ओह नो म्हणजे संयु ने नंबर चेंज केला. कुठे असेल ती? मितेश सुखात रहावा म्हणून मुद्दाम त्याच्या पासून दूर गेली. असा विचार तो करत राहिला. दुसऱ्या दिवशी तो पल्लू ला भेटायला गेला. पल्लू तुला समजत कसे नाही आता मितेश ला फक्त संयु सांभाळू शकते. त्याला या दुःखातून तीच बाहेर काढू शकते तू प्लिज मला सांग कुठे आहे ती. निनाद खरच मला माहित नाही रे. तुझा मोबाइल बघू निनाद म्हणाला. घे म्हणत तिने आपला फोन दिला.