संगत सकाळी करनला कोणाचा तरी फोन आला. समोरुन फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून करनचा चेहरा अचानक चिंताग्रस्त झाला. त्याने फोन कट केला. त्याचवेळी त्याच्या आईने त्याला जेवायला वाढले होते. पण तो न जेवताच बाहेर जावू लागला. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला थांबवून विचारले. " तु कोणत्या तरी कारणामुळे तणावात दिसतोस. नक्की तणावाचे काय कारण आहे?" "काही नाही बाबा." करन त्यांच्याकडे न पाहता दुसरीकडे मान वळवून बोलला. "मी तुला गेल्या एक हप्त्यापासून पाहत आहे. तु तुझ्याच तंद्रीत आहेस. नक्की तु कोणत्यातरी संकटात आहेस. पण तु आमच्यापासून काहीतरी लपवतो आहेस. मला बिनधास्त सांग. मी तुला काहीच बोलणार नाही. उलट तुला संकटातून बाहेर पडायला