चौपाडी - एक भूक! - ०२

  • 5.7k
  • 3.2k

आतापर्यंत आपण बघीतले,नेपाळी कुटुंबाच्या स्थलांतराने केवळ त्यांच्या कुटुंबियांचेच स्थलांतर झाले नव्हते. तर, सोबतंच त्यांच्या अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर घडून आले. त्यातीलंच एक म्हणजे, "चौपाडी प्रथा!" आता पुढे!भावरूपा जिवाच्या आकांताने ओरडत दित्याला चौपाडीवर पाठवण्याचा विरोध करू लागली!दित्या आणि भावरूपाची आई दोघींना काहीच सुचेना!"आमा, काय झाले? रडू नकोस ना तू." दित्या रडकुंडीला आली."कसं सांगू दित्या तुला, गाम्म्यासोबत जे काही घडले, त्याचा अनुभव मला चौपाडी वर असताना आला आहे!!" भावरूपा आता हुंदके देत ओक्साबोक्सी रडू लागली."काय?????" दित्या आणि हजुरआमा आश्चर्यचकित होऊन भावरूपाकडे बघू लागल्या."हो आमा, म्हणूनच मी दित्याला चौपाडी जायला नको म्हणत होते!" भावरूपाने रडतंच सांगीतले."पण, हे कधी घडले? आणि कोणी केले?