चौपाडी - एक भूक! - ०३

  • 6.8k
  • 3.6k

आतापर्यंत आपण बघीतले,चौपाडी प्रथेमुळे भावरुपाने सहन केलेल्या शारीरिक यातना तिने दित्या आणि हजुरआमा समोर जिवाच्या आकांताने मांडल्या होत्या. त्या ऐकून दित्याने उद्गमची विल्हेवाट लावायची युक्ती सुचवली होती! आता पुढे!सायंकाळी ०६:०० च्या सुमारास!"दित्या बाळा चल, चौपाडी जायचं आहे." शेजार पाजारच्यांना आवाज जाईल इतक्या मोठ्याने भावरूपा ओरडून म्हणाली."हो आमा." दित्या बाहेर पडली आणि भावरूपाच्या हातात हात घालून चौपाडीच्या दिशेने निघाली.तांड्यात गर्दी जमली आणि समूहात कुजबुज सुरू झाली. त्या समूहात एका व्यक्तीची त्या दोघींवर नजर होतीच!दित्याला चौपाडीवर सोडून देत भावरूपा घरी परतली.रात्री ११:०० वाजता!काळ्या रंगाची शाल फक्त डोळे उघडे राहतील अशी अंगाला गुंडाळून एक व्यक्ती चौपाडीच्या दिशेने निघाला. चौपाडीपासून काहीच अंतरावर उभं राहून