इंद्रजा - 4

  • 12.8k
  • 7.1k

भाग-४ जिजा रागातच निघुन गेली.......इंद्रा तिला जाताना पाहत होता........त्याला सुद्धा तिचा जरा रागच आला..... इंद्रजीत- काय समजते ही स्वतःला..? माझ्या खोलीत येऊन मलाच माज दाखवत होती..खरच भांडखोर आहे ही..कुणास ठाऊक सगळ्यांशी भांडते की फक्त माझ्याशी...जाऊदे..काय म्हणाव आता..देव पण अशा लोकांसोबत माझी ओळख करून देते...बहुतेक ही हाहाकारी मागच्या जन्मी माझी सासु असावी आणि मी हिचा सुनम्हणून इतकी छळते...देवा बचाव आता तेवढ्यात त्याचा फोन वाजला..........स्क्रीनवर अर्चना ताई️ नाव आल.......तस त्याने कॉल उचलला... इंद्रजीत- हेल्लो,हा अरचू ताई..बोल ना........... अर्चना- इ इंद्रा............. (ती रडत म्हणाली) इंद्रजीत- अरचू ताई काय झाल? तू रडत आहेस का? अकुंर जी काही बोले का??.............. अर्चना- नाही अंकुर काही नाही