चौपाडी - एक भूक! - ०५ (शेवट)

  • 7.1k
  • 3.4k

आतापर्यंत आपण बघीतले,भावरूपा आणि हजुरआमा दोघींकडून कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यात न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती. घडलेल्या प्रकारामुळे दित्याच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला होता.आता पुढे!दित्या आधीपेक्षा जास्तच शांत झाली होती. प्रशासकीय आदेशानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. तिथे तिला मानसिक स्थैर्य प्राप्त व्हावे याकरिता दिनचर्या ठरवून देण्यात आली. त्यानुसार तिने स्वतःस बदलण्याचे खूप प्रयत्न केले. पण काही जखमा कधीच भरल्या जात नसतात; याचे अनुभव दित्याला उपचार घेत असता आले. किती जरी तिने स्वतःस समजावण्याचा प्रयत्न केला असला; तरी तिची आमा गुन्हेगार आहे हे तिच्या बालमनाला पटण्यासारखे नव्हते! काहीच दिवसांत दित्या घरी परतली आणि तिची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली.अशातंच तिची भेट झाली एका