चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 5

  • 7k
  • 3.6k

५. जंगलाची ओळखडुंगा पिळदार शरीराचा, पण काळ्याकभिन्न वर्णाचा होता. त्याने कंबरेभोवती कुठच्या तरी झाडाचे पान गुंडाळले होते. ते थोडे जाड होते. सुती कपड्याप्रमाणे वाटत होते. अचानक चंद्राच्या लक्षात आलं की, त्याला मिळालेल्या बाटलीतील संदेश ज्या पानावर लिहिलेला होता ते पान अगदी याच प्रकारचे होते. म्हणजे तो नक्कीच निळ्या बेटावर पोहोचला होता. आता त्या अज्ञात माणसाचा शोध घ्यावा लागणार होता. डुंगाच्या डोक्यावर दोन मोरपिसे तिरकी खोवलेली दिसत होती. चंद्राच्या लक्षातआलं की डुंगाच्या उजव्या मनगटावर मोराची आकृती गोंदलेली दिसत होती. चंद्रा डुंगाचे निरीक्षण करत होता. त्या वेळी डुंगा हळूहळू मागे सरकत होता. त्याचं संपूर्ण लक्ष गुरगुरणाच्या वाघ्यावर होतं. बहुधा तो वाघ्याला घाबरत