सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 1

  • 13.7k
  • 8.7k

हळूहळू विक्रांत ने आपले डोळे उघडले त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला. डोकं जड झाले होते. उजवा हात बांधलेला जाणवत होता. त्याने पूर्ण डोळे उघडले पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. त्याने आपला उजवा हात उचलला पण त्याला प्लास्टर होते. मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्याला बैंडेज होते. त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गीतु चा एक्सीडेंट झाला होता तो ही हाय वे वर. जेव्हा ते दोघे त्यांची दूसरी मॅरेज एनिवर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते. त्यांच्या ध्यानिमनी नसताना अचानक एक टैंकर मागून येवून जोरात त्यांच्या कार ला धडकला होता. संयोगीता विक्रांत ची