चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर ६६. मयुरांच्या वस्तीमध्येदुसऱ्या दिवशीही डुंगा अगदी कालच्याच वेळेवर आला. चंद्रा त्यालाघेऊन नदीकिनारी गेला. तिथे त्याने तराफा तयार करण्यासाठी जमा केलेले मोठ्या बांबूचे तुकडे... वळलेल्या दोर्या दाखवल्या. डुंगाला त्या दोर्या पाहून आश्चर्य वाटले. त्याची जमात आणि शिंगाडे बांधण्यासाठी वेली वापरत. त्या वेलींपेक्षा वेलींपासून पीळ देऊन बनविलेल्या दोऱ्या अतिशय मजबूत व टिकाऊ होत्या. चंद्राने त्याला मासे पकडण्यासाठी बनविलेलं जाळं व छोट्या प्राण्यांना पकडण्यासाठी बनवलेलीफासकी दाखवली. हे सारं पाहून डुंगा खूश झाला. चंद्राकडून त्याला हे शिकायचं होतं. खरे म्हणजे निळ्या बेटावरचे हे आदिवासी इतर जगापेक्षा खूपच मागास होते. बाहेरच्या जगाशी त्यांचा कधी संबंध आला नव्हता. भीतीमुळे व निळ्या