सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 6

  • 8.5k
  • 4k

विक्रांत घरी आला तसे सुरेखा मावशी बोलल्या साहेब जरा थांबा . काय झाले मावशी तो विचारत होता तितक्यात मावशी आरतीच ताट घेवून आल्या विक्रांत चे औक्षण करायला. मावशी माझा विश्वास नाही या सगळ्या वर . माझ आणि देवाच कधी पटले नाही. असु दे ख़ुप मोठ्या अपघातातून सुखरूप बाहेर आलात ही त्या देवाचीच कृपा आता वहिनी साहेब असत्या तर त्यांनी पण हेच केले असते. विकी असु दे तुच म्हणतो ना कि कोणाच्या भावना दुखवू नयेत. संदीप म्हणाला. मग विक्रांत ने औक्षण करून घेतले. गीतु ची ख़ुप आठवण झाली त्याला. तो रूम मध्ये आला .सगळीकडे संयोगीता च्या आठवणी होत्या.संयोगीता त्याच्या आयुष्यात आली