सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 9

  • 8.9k
  • 3.6k

हो ग मी थांबणार आहे तुझ्या सोबत मल्हार म्हणाला. विक्रांत ने सगळे प्रदर्शन बघितले सगळयांच्या कलाकृती बघितल्या. आता कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे बक्षीस समारंभ होता. सगळे जण तिथेच बाजूला असणाऱ्या हॉल मध्ये जमा झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक,अजून काही मंडळी आणि विक्रांत स्टेजवर खुर्च्यावर बसले होते. आयोजक बोलत होते. सगळ्यांचे काम छान आहे पण तरी ही तीन नंबर आम्ही काढणार आहोत आणि त्यांना बक्षीस दिले जाईल. मग तीन नंबरचे नाव पाहिले जाहीर केले . त्यांनतर दोन नंबर . आता सर्वांना उत्सुकता होती की पहिला नंबर कोणत्या शिल्पा ला मिळाला असेल तसे आयोजकांनी संयोगीता निंबाळकर यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळत आहे असं