चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8

  • 6.8k
  • 3k

८. दंतवर्मांची कहाणीखरं म्हणजे परतीचा प्रवास खूपच कठीण होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचे होते. तराफ्यावर दोघांऐवजी आता तिघेजण होते. चंद्राला जादा शक्तीचा वापर तराफा वल्हवायला करावा लागत होता. त्याने तराफा थोडा उजव्या कडेने हाकायला सुरुवात केली. मध्यभागापेक्षा कडेला पाण्याचा वेग कमी होता. आणखी काही वेळाने काळोख पडणार होता. त्यापूर्वी जास्तीतजास्त अंतर पार करणे गरजेचे होते. झाडांचे निळसर शेंडे तांबूस सूर्यकिरणांनी चमकत होते. पश्चिमेला नारिंगी-गुलाबी रंगाची उधळण सुरू झालीहोती. पक्षी घरट्याकडे परतत होते. एकेठिकाणी तर नदीकाठचं झाड लांबून पांढरेशुभ्र दिसत होतं. चंद्राला कळेना, या झाडाला कशा प्रकारची पांढरी फळं धरली आहेत? पण थोडं पुढं येताच त्यांच्या डोक्यावरून बगळ्यांचा कळप उडत गेला