चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 9

  • 6.6k
  • 3k

. ९ शिंगाड्यांशी पुन्हा सामनादुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटानं चंद्राला जाग आली. त्याने बाजूला पाहिले, दंतवर्मा कुठेही दिसले नाहीत. डुंगा मात्र अजूनही झोपेत होता. काल रात्री दंतवर्मांचीची गोष्ट ऐकता ऐकता झोपायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे डुंगाला अजून जाग आली नव्हती. चंद्रा शरीराला झटका देत उठला. तो दंतवर्मांच्या कहाणीचा विचार करत होता. भद्रसेनांच्या बंधूने केलेल्या अविचारामुळे सारा मद्र देश भयावह संकटात सापडला होता. त्यातून सुटका होण्यासाठी तो मुकूट देवीच्या डोक्यावर विधिवत स्थापन करणे गरजेचे होते. तसा मुकूटही दंतवर्मांनी .तयार करून आणला होता. पण जोपर्यंत त्या मुकुटावरचा गुलाबी हिरा सापडत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होते. रुद्रसेन तो गुलाबी हिरा घेऊन कुठे गेला