चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 11

  • 6.5k
  • 2.8k

११. निळ्या बेटावरून प्रयाणदुसऱ्या दिवशी चंद्रा, दंतवर्मा व डुंगाने परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. चंद्रा व दंतवर्मा जात आहेत, हे ऐकून साऱ्या मयुरांना वाईट वाटले. काही मयूर चक्क रडू लागले. गेल्या काही दिवसांत चंद्रा, वाघ्या व दंतवर्मा हे मयुरांमध्ये मिसळून गेले होते. त्यांच्यातीलच एक होऊन गेले होते. त्यामुळे साऱ्यांना वाईट वाटणे साहजिकच होते. चंद्राला एकीकडे इथून आपण आपल्या घरी जाणार म्हणून आनंद झाला होता, तर दुसरीकडे हे अद्भुत निळे बेट, इथले पशुपक्षी, विलक्षण झाडे, डंगासारखा मित्र, इथे केलेली साहसे... हे पुन्हा मिळणार नाही म्हणून वाईटही वाटत होते. मंगाने साऱ्यांना समजावले. चंद्राला आपण आनंदाने निरोप देऊ या. त्यासाठी रात्री खास मेजवानी