चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर भाग 13भाग १३गुलाबी हिऱ्याची प्राप्तीतोपर्यंत बरचशे कोळी लोक व दंतवर्मा गलबतावर पोहचले होते.गलबतावर एकच हल्लाबोल सुरू होता. लपून बसलेल्या डाकूंवर दंतवर्मां व कोळी लोक तुटून पडले. दंतवर्मांसारख्या कसलेल्या सेनानीच्या युद्ध कौशल्यासमोर डाकूंचा आडदंडपणा चालेना. इकडे चंद्रा सावधगिरीने पुढे सरकत होता. आत सात ते आठ माणसे होती. गलबतवरची सारी कामे हेच लोक करायचे. बाहेर चाललेल्या गलक्याने व किंकाळ्यांनी सारे घाबरले होते.भीतीने थरथर कापत होते. सारी कामे टाकून कोपऱ्यात जमा झाले होते."कोणतीही गडबड न करता तिथेच उभे रहा...घाबरु नका....मी तुम्हाला कोणतीही इजा करणार नाही." चंद्रा शांतपणे म्हणाला. ते लोक खूष झाले. डाकूंच्या तावडीतून आपली आता सुटका होईल